यवतमाळ नगरपालिका संकेतस्थळावर नागरिक नोंदणी कशी करावी? +
यवतमाळ नगरपालिकेचे संकेतस्थळ ==== जाऊन LOGIN बटन वर क्लिक करा. त्यानंतर "नोंदणी करा" या बटनावर क्लिक करा. दिसणाऱ्या स्क्रीनवर आपली आवश्यक वैयक्तिक माहिती भरून आपण संकेतस्थळावर नोंदणी करू शकता.
यवतमाळ नगरपालिका अंतर्गत विविध अधिकाऱ्यांची संपर्क क्रमांकाची माहिती कशी उपलब्ध होईल? +
यवतमाळ नगरपालिकेच्या संकेतस्थळवर विभाग या मेनूला क्लिक केलेनंतर नगरपालिकेतील विविध अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकाची माहिती आपल्यास उपलब्ध होईल.
नगर परिषदेमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर किती दिवसांत त्यावर कार्यवाही होईल?+
यवतमाळ नगरपालिकेच्या संकेतस्थळवर विभाग या मेनूला क्लिक केलेनंतर नगरपालिकेतील विविध अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकाची माहिती आपल्यास उपलब्ध होईल.
अतिक्रमणावर कारवाईसाठी नगर परिषदेकडे कसा अर्ज करावा?+
अतिक्रमणाबाबत तक्रार नगर रचना विभागात नोंदवावी लागते. तक्रारीवर कार्यवाही करून अतिक्रमण हटवले जाईल.
सार्वजनिक कार्यक्रमासाठी जागेची परवानगी कशी मिळवायची?+
सार्वजनिक कार्यक्रमांसाठी जागेची परवानगी मिळवण्यासाठी अर्ज सादर करावा लागतो. संबंधित विभागात अर्जासोबत कार्यक्रमाचा तपशील आणि सुरक्षा योजना सादर करावी लागेल.
माझ्या परिसरात कचरा संकलन नियमित होत नाही, त्यासाठी काय करावे?+
जर कचरा संकलन नियमित होत नसेल, तर तुम्ही स्वच्छता विभागाशी संपर्क साधू शकता किंवा नगर परिषदेच्या तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता.
सार्वजनिक ठिकाणांवर कचरा टाकल्यास काय कारवाई होते?+
सार्वजनिक ठिकाणांवर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. नगर परिषद स्वच्छतेचे नियम तोडणाऱ्यांवर दंड आकारते.
बांधकाम परवाना कसा मिळवावा?+
बांधकाम परवान्यासाठी नगर परिषदाच्या नागर रचना विभागात अर्ज करावा लागेल. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
नवीन रस्ता बांधण्यासाठी अर्ज कसा करावा?+
नवीन रस्ता बांधणीसाठी बांधकाम विभागाकडे लेखी अर्ज करावा लागतो.
नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यासाठी अर्ज कसा करावा?+
नवीन पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी अर्ज बांधकाम विभागाकडे सादर करावा.