Designation - विभाग प्रमुख
Name - प्रिया थुल
Email - npyavatmalest@gmail.com
Contact No. - 9860381676
जन्म मृत्यू अधिनियम १९६९ व महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी २००० प्रमाणे यवतमाळ नगरपालिका शहर हद्दीत होणाऱ्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतची विभागामार्फत होणारी कामे.
१. यवतमाळ शहरातील वैद्यकीय संस्थांनी/दवाखान्यांनी जन्म मृत्यू नोंदणी अहवाल (नमुना क्र. १ व २) सुवाच्च, स्पष्ट, खाडाखोड विरहीत सादर केलेनंतर तसेच, मृत्यू नोंद अहवालासोबत फॉर्म क्र, ४ (मृत्यूचे कारण) पूर्ण भरून सादर केलेनंतर नागरिकांना जन्म – मृत्यू नोंदीचे प्रमाणपत्र उपलब्ध होते.
२. यावतमाळ शहरातील घरी घडून आलेल्या मृत्यू घटनांची नोंद करताना विहित नमुन्याप्रमाणे अर्ज, अंत्यसंस्कार पावती, नमुना क्र. ४ (अ) घरी झालेल्या मृत्यूचे कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
३. घरी जन्म झालेल्या घटनांची नोंद करताना विहित नमुन्याप्रमाणे अर्ज प्रसूतीपूर्व/पश्चात तपासणी कार्ड किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
४. बाळाच्या जन्माचा नाव नोंदणीचा पहिला दाखला काढताना बाळाचे आई किंवा वडील स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे. जन्मलेल्या मुला/मुलींचे नाव एकदा नोंदविले नंतर त्यामध्ये बदल करण्याची तरतूद नाही.
५. जन्म दाखल्यातील दाखल केलेल्या नावाव्यतिरिक्त इतर दुरुस्ती बदल करणे करिता नमुन्याप्रमाणे अर्ज, डिक्लेरेशन फॉर्म, रेशनकार्ड झेरॉक्स, पुरावा प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
No file uploaded for this department.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358