Department for Person with Disabilities

Home Department for Person with Disabilities

profile

Designation - विभाग प्रमुख

Name - मनोज हुमणे

Email - manojhumne05@gmail.com

Contact No. - 9359396755


१) महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, शासन परिपत्रक क्र. संकिर्ण -२०१३/मुमंस-३१/प्र.क्र.८८/नवि-२० दिनांक ४/१०/२०२०१३ अन्वये यवतमाळ नगर परिषद कार्यक्षेत्रामधील दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करणे.

२) महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र./दिव्यांग-२०१८/प्र.क्र.५२/१८/नवि-२८, दिनांक १०/५/२०१८ अन्वये नगर परिषदांच्या क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी ५% निधी राखीव ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहे. त्यानुसार यवतमाळ नगर परिषदेची विशेष अंदाजपत्रकीय सभा घेऊन लेखापाल नगर परिषद यवतमाळ यांचे कडील आर्थीक वर्षाकरीता दिव्यांग कल्याणार्थ अंदाजपत्रक पुस्तकामध्ये तरतुद करणे.

३) महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.११८/नवि-२० दिनांक २८/१०/२०१५ अन्वये दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेली निधी दिव्यांगासाठी कोणकोणत्या योजनांवर खर्च करावे त्या बाबत मार्गदर्शन व सुचना दिले आहे. त्यामधील मधील मुद्दा क्र. ३ नुसार दिव्यांग नागरीकांच्या मागणीनुसार त्यांना उदारनिर्वाह देण्याबाबत निधी थेट लाभार्थांच्या बॅंक खात्यात (NEFT/RTGS द्वारे) जमा करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. त्यानुसार यवतमाळ नगर परिषद मधील दिव्यांग कल्याण कक्ष येथील नोंदणीधारक दिव्यांग व्यक्तींना सानुग्रह अनुदान/उदारनिर्वाह भत्ता/आर्थीक सहाय्य देण्याबाबत कार्यवाही करणे.

४) महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. विसयो-२०२०/प्र.क्र.१००/विसयो दिनांक ३/५/२०२१ मधील (मुद्दा क्र. ४ नुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींनी दिनांक ०१ एप्रील ते ३० जुन या कालावधीत हयात असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या कालावधीत हयात प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे जुलैपासुन अर्थसहाय्य बंद करण्यात यावे. लाभार्थंनी त्याच वर्षाच्या १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत हयात प्रमाणपत्र सादर केल्यास प्रकरणांतील अपरिहार्यता/अपवदात्मक परिस्थिती विचारात घेऊन लाभार्थांचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पुर्ववत करण्यात यावे. अन्य प्रकरणांत हयात प्रमाणपत्र सादर केल्यापासुन लाभ सुरु करण्यात यावा.) असे नमुद आहे.

त्यानुसार दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणार्थ अंदाजपत्रकीय तरतुदी प्रमाणे ५ % निधीतुन नगर परिषद स्तरावर दिव्यांग व्यक्तींचे हयात प्रमाणपत्र सादर करणेकरीता वर्तमान पत्रात प्रेस नोट देण्यात येते. तसेच दिव्यांग व्यक्तींचे दिव्यांग कल्याण कक्ष विभागात उपलब्ध असलेल्या मोबाईलवर नंबरवर कॉल करुन त्यांना हयात अर्ज कार्यालयात सादर करण्याबाबत कळविण्यात येते.

त्यानंतर उक्त कालावधीत प्राप्त झालेले हयात प्रमाणपत्र व सदर कालावधीत नवीन नोंद झालेले दिव्यांग व्यक्तींना सानुग्रह अनुदान/उदारनिर्वाह भत्ता/आर्थीक सहाय्य देण्याकरीता सदरचा विषय चर्चेकरीता मा. सर्वसाधारण समिती सभेपुढे ठेवण्यात येतो. सभेची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना सानुग्रह अनुदान/उदारनिर्वाह भत्ता/आर्थीक सहाय्य देण्यात येतो.

No file uploaded for this department.

Quick Links

Get In Touch

Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001

npyavatmal@gmail.com

1800 233 6358

Follow Us

© Yavatmal. All Rights Reserved.

FAQs Privacy Policy