Designation - नगर अग्निशामक अधिकारी
Name - विनोद चिंधाजी खरात
Email - npyavatmalfire@gmail.com
Contact No. - 9604935789
अ.क्र. | फायर स्टेशन | पत्ता |
---|---|---|
अग्निशमन स्थानक (फायर स्टेशन ) | अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग आर्णी रोड, लोकमान्य चौक, यवतमाळ |
यवतमाळ शहरातील विविध व्यवसाय, उद्योग यांना लावणेत आलेली अग्निशमन शुल्क
यवतमाळ नगरपरिषदेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाच्या वतीने शहरात व शहराबाहेर विविध प्रकारची सेवा देणेत येते तसेच शहराअंतर्गत विविध उद्योग, व्यावसाय, हॉटेल, हॉस्पीटल, चित्रपटगृह, कारखाने इतर सेवा यांची तपासणी करून त्यांना ना हरकत दाखला देण्यात येतो. याकरिता संबधित व्यवसायधारक यांच्या कडून (महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 भारतीय उत्स्फोअक कायदा, दि. गॅस सिलेंडर नियम व दि पेट्रोलियम कायदा 1934 नियम 1976 नुसार) फी व भाडे निश्चित केले आहेत.
अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाकडील विविध कार्ये
शहरात घडणाऱ्या आगीच्या घटना वर लवकर नियंत्रण मिळविणे व कोणत्याही खाजगी तथा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ न देणे. तसेच जीविताची रक्षा करणे व वाचविणे. इत्यादी कामे अग्निशमन व आणीबाणी सेवा यांच्या कडून करण्यात येते.
14 एप्रिल ते 20 एप्रिल रोजी शहरात अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. शहरामधून प्रबोधन रॅली काढण्यात येते. तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी उदा. शाळा, हॉस्पीटल, शासकीय कार्यालय, रहिवाशी इमारत या ठिकाणी आग प्रतिबंध व जीव सुरक्षा याबाबत प्रात्यक्षिके व माहिती देण्यात येते.
यवतमाळ शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडा
यवतमाळ शहराची लोकसंख्या सन 2011 च्या जणगणने नुसार यवतमाळ शहराची लोकसंख्या 2 लाख जवळपास आहे.
• मागील पर्जन्यवृष्टीच्या दरम्यानचा अनुभव लक्षात घेता झाडे, झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडून वाहतुक कोलमडणे विज विद्युत वाहिनीच्या तारा वर पडून विद्युत वाहिनीचे खांब रस्त्यावर पडणे तसेच घरावर झाडे पडून मनुष्य व वित्तहानी होणेची घटना यवतमाळ शहरात घडलेल्या आहेत. तसेच शहरालगत असणारा हायवे वर आपात्कालीन परिस्थितीमध्ये डीझेल टँकर, इतर वाहने, अपघात होवून त्यावेळी मोठ्या प्रमाणात इतर वाहनांना हानी होणार नाही यादृष्टीने स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वीत करण्याची गरज लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो.
No file uploaded for this department.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358