ॲड. प्रियदर्शनी अशोक उईके या प्रगतिशील विचारसरणीच्या असून सार्वजनिक जीवनात सक्रिय नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्यांनी २०१३–१८ दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, नागपूर येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१९-२० मध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठातून संवैधानिक व प्रशासकीय कायद्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. जिल्हा न्यायालयात वकील म्हणून तीन वर्षांचा अनुभव घेत त्यांनी न्यायव्यवस्थेतील सखोल ज्ञान आत्मसात केले आहे. तसेच ७ ऑक्टोबर २०२५ पासून मुंबई उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ येथे बी पॅनल समुपदेशी (सहकार वकील) म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.सध्या त्या नगर परिषद यवतमाळच्या नगराध्यक्षा म्हणून कार्यरत असून, शहराच्या विकासासाठी, पारदर्शक प्रशासन व नागरिकाभिमुख सेवांसाठी कटिबद्ध आहेत.
प्रमुख उद्दिष्टे :
• शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व दुरुस्ती
• नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत करणे
• योग्य ड्रेनेज व स्वच्छता व्यवस्था उभारणे
• सर्व भागात एलईडी स्ट्रीट लाईट बसवणे
• उद्याने व वृक्षारोपणाद्वारे शहर हरित करणे
• कचरा व्यवस्थापन सुधारून स्वच्छ शहर निर्माण करणे
• आरोग्य व स्वच्छता मोहिमा राबवणे
• नगर परिषद सेवा डिजिटल करून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करणे
समाजाला संदेश :
स्वच्छ, सुंदर व विकसित शहरासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. स्वच्छता राखणे, पर्यावरण जपणे आणि सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358