मा. विलास उर्फ दत्ता वसंतराव कुलकर्णी हे सन १९८० पासून सामाजिक कार्यात सक्रिय असून समाजातील विविध समस्या शासन दरबारी मांडून त्यांचे निराकरण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
खटेश्वर देवस्थान व स्वामी समर्थ केंद्राचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी धार्मिक व सामाजिक उपक्रमांना चालना दिली. स्वराज व्यायामशाळा अध्यक्ष म्हणून युवकांमध्ये शिस्त व तंदुरुस्तीची जाणीव निर्माण केली. स्वामी समर्थ वृक्ष समितीचे अध्यक्ष म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी काम केले. तसेच नगर परिषद यवतमाळ प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिले.
साईबाबा देवस्थान यवतमाळ येथे सल्लागार व ज्ञानेश्वर मंदिर येथे सक्रिय सहभागातून त्यांनी समाजाशी घट्ट नाते निर्माण केले आहे. सध्या ते नगर परिषदेमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठी सातत्याने कार्य करीत आहेत.
प्रमुख उद्दिष्टे :
• शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधणे
• नागरिकांना मूलभूत सुविधा (पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते) उत्तम दर्जात उपलब्ध करून देणे
• स्वच्छ, हरित व प्रदूषणमुक्त शहर घडविणे
• शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावणे व शाळांची गुणवत्ता वाढविणे
• पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व जनजागृती करणे
• युवकांना प्रोत्साहन देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडविणे.
• नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करणे
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358