| Photo | Name | Designation | Mobile |
|---|
प्रस्तावना
नगर परिषद यवतमाळ विद्युत विभागामार्फत यवतमाळ शहरात प्रकाश व्यवस्था करण्यात
येते. सध्यास्थितीत नगर परिषद क्षेत्रात अंदाजे २२००० पथादिवे आहे. यवतमाळ
नगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून प्रामुख्याने नगरपालिकेतील सार्वजनिक ठिकाणी असणा-
या विद्युत यंत्रणेच्या व्यवस्थापनाचे कामकाज पाहिले जाते. शहरात कार्यक्षम विद्युत यंत्रणा
बसविणे, सार्वजनिक विद्युत यंत्रणेचा विशिष्ट दर्जा निर्माण करणे , वाहन आणि पादचारी
सुरक्षेसाठी रस्त्यांवर योग्य प्रकाशव्यवस्था निर्माण करणे आणि एलईडी दिवे व सौर उर्जा वापर
करून वीज बचत करण्यावर विभागाचा अधिक भर आहे.
1. नगर परिषद विद्युत विभाग मार्फत प्रामुख्याने खालील कामकाज करण्यात येते.
2. नगर परिषद यवतमाळ क्षेत्रातील दैनंदिन पथदिव्यांचे देखभाल व दुरुस्ती करणे.
3. नगर परिषद यवतमाळ विद्युत विभागातील विकास कामांचे आराखडे, अंदाजपत्रके
तयार करून प्रस्ताव शासनास सादर करणे. विकास कामांकरिता निधी मागणी करून
कामे पूर्ण करणे.
4. लोकशाही दिन, आपले सरकार, नागरिकांचे अर्ज , ऑनलाईन तक्रारी पाहणे व त्यांचे
निवारण करणे .
5. विद्युत विभाग माहिती अधिकारातील माहिती उपलब्ध करून देणे.
6. नगर परिषदेची सर्व इमारती , सार्वजनिक शौचालय , उद्याने इ, ठिकाणी आवश्यक
विद्युतीकरणाचे कामे पार पाडणे.
7. नगर परिषद अंतर्गत शासनाचे विविध योजने अंतर्गत विकास कामे पार पाडणे . (
जिल्हा वार्षिक योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरोत्थान अभियान , वैशिष्टपुर्ण योजना
माझी वसुंधरा इ. )
8. नगर परिषद क्षेत्रात उर्जा बचत करणे करीता आवश्यक उपाय योजना करणे.
No files uploaded.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358